Type Here to Get Search Results !

ads

खुशखबर..!अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी ७५५ कोटी रुपयांचे वाटप होणार



 मुंबई दि. २८ महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी ७५५ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे व ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर ३१ मार्च २०२३ पूर्वी अतिवृष्टीची नुकसान भरपाई वर्ग करण्यात येणार आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.





याबाबत सदस्य प्रकाश सोळंके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी ३ हजार ३०० कोटींची अतिरिक्त मागणी आहे. यामध्ये तांत्रिक समितीद्वारे वैधता तपासण्यात येईल. शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी दिल्या जाणाऱ्या ६ हजार ८०० कोटींपैकी ६ हजार कोटींचे वाटप झाले आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. आतापर्यंत अनुदानापोटी ४ हजार ७०० कोटी वितरित करण्यात आले असून जवळपास १२ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे व अतिवृष्टी नुकसानीस वंचित राहिलेल्या शेतकऱ्याना ३१ मार्च २०२३ पर्यंत अतिवृष्टी नुकसान भरपाई खात्यात जमा करण्यात येणार आहेत व याद्या आपापल्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी विधानसभेत सांगितले.

याद्या डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा


Whatsapp Group ला JOIN होण्यासाठी इथे click करा


वरील लेख आवडला असेल तर माहिती share करू शकता व आमच्या Whatsapp Group join होऊन वरील लिंक ला Click करून जॉईन होऊ शकता. जेणेकरून आपल्याला विविध सरकारी योजनांच्या माहिती आपल्या mobile वर मिळतील.

Top Post Ad

Below Post Ad

Ads