नमो शेतकरी सन्मान योजना संपूर्ण माहिती
नमस्कार मित्रांनो आज आपण पी एम किसान योजना सारखी नमो शेतकरी सन्मान योजना बद्दल माहिती घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी सन्मान योजना अंतर्गत १.१५ कोटी शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार आहे. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सदर केलेल्या अर्थसंकल्प २०२३-२०२४ मध्ये घोषणा केली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी हि योजना केंद्र सरकारची असून योजनेमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांना ६००० हजार रुपये देण्यार येतात तर त्याच प्रमाणे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना हि महाराष्ट्र शासनाची योजना आहे तर या योजनेमध्ये देखील प्रती वर्षी ६००० हजार रुपये मिळणार आहेत.
अर्ज कुठे करावा ?
तर शेतकरी मित्रांना या साठी कुठे हि अर्ज करण्याची आवश्यकता नसून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणे आपल्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत. आणि अजून काही माहिती आल्यास आपल्याला पुढचा लेखामध्ये कळविले जाईल.
कोणाकडून किती अनुदान मिळेल ?
१) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कडून ६००० हजार रुपये प्रतिवर्षी मिळेल.
२) नमो शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत आपल्याला ६००० हजार रुपये एवढे अनुदान स्वरुपात दर वर्षी भेटत राहतील.
केंद्र सरकार :- ६००० हजार रुपये.
राज्य सरकार :- ६००० हजार रुपये.
एकूण अनुदान हे :- १२,००० हजार रुपये अनुदान असणार आहे.
पुढचा काही दिवसात महाराष्ट्र शासनाची नमो किसान सन्मान निधी योजनेची स्वतंत्र संकेतस्थळ देखील प्रसिद्ध करण्यात येणार आहे. स्वतंत्र संकेतस्थळ तयार झाल्यावर आपल्याला माहिती देण्यात येणार.
धन्यवाद
Social Plugin