मुंबई:- राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेचा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बोलत असतांना यावेळी अशी घोसना केली कि राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार आता प्रती क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. २०० रुपये अनुदानाची शिफारस करण्यात आली होती मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३५० रुपये प्रती क्विंटल अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधकांनी कांदा प्रश्नावरून मोठा गदारोड केला होता. पण त्याला उत्तर देतांना मुक्यामंत्री एकनाथ शिंदे यांनी हि घोषणा केली आहे. एन हंगामी वेळेस कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना दिलासा म्हणून ३५० रुपये प्रती क्विंटल सानुग्रह अनुदान निश्चित केले आहे. यात राज्य शासनचा वाट हा ४३% असून कांदा उत्पन्नात महाराष्ट्र राज्य हे अग्रेसर आहे.
Social Plugin