सिलिंगपूर ता. तळोदा येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
तळोदा :- दि. १५ फेब्रुवारी २०२३ रोजी सिलिंगपूर ता. तळोदा येथे प्रथमच बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली. सिलिंगपूर हे तळोदा तालुक्यातील असे एकमेव असे गाव आहे जिथे बंजारा समाज वस्ती जास्त आहे. संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजातील सतगुरु आहे. क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांच्या जन्म १५ फेब्रुवारी १७३९ मध्ये आंध्रप्रदेश मधील अनंतपुर जिल्ह्यातील गुट्टी तालुक्यातील गोलाल डोडी गावात झाला. आता त्यागावाचे नाव सेवागड झाले आहे.सामाजिक व धार्मिक सुधारक होते. सेवालाल महाराज हे आयुष्यभर ब्रम्हचारी राहिले. अश्या महान व्यक्तीची जयंती सिलिंगपूर गावात प्रथमच संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. व उपस्थित मान्यवर वंचित बहुजन आघाडीचे तळोदा तालुका अध्यक्ष विशाल भाऊ सामुद्रे, सिलिंगपूर गावाचे सरपंच रायसिंग मोरे, विनोद चव्हाण, करण पवार, सुभाष पवार, रविंद्र मोरे, भुर्या सामुद्रे, रमेश ठाकरे, बहादूर ठाकरे, हेमंत मोरे, जगदीश जाधव, संपत डोंगरे, व संपूर्ण गावातील बंजारा समाज उपस्थित होता.
Social Plugin