नमस्कार मित्रांनो आज आपण शेती खरेदी विक्री संबंधी माहिती घेणार आहोत. शेत जमीन खरेदी-विक्री म्हणजे दोन व्यक्तीतील व्यवहार नसून हि एक कायदेशीर प्रक्रिया व तरतूद आहे. त्या मध्ये आपल्याला काही कायदेशीर बाबी समजून घ्याव्या लागतात. पण काही वाईट प्रवृतीमुळे बर्याच ठिकाणी वाद निर्माण होतात. हे कश्यामुळे निर्माण होतात हे आपण तर पाहू सर्विस्तर
जसे कि एखादी व्यक्ती किंवा जमीन मालकाने शेत जमीन विकल्यानंतर त्यांचे नातेवाईक जसे कि भाऊ, बहिण, पत्नी, मुले, मुली, यांनी त्या शेत जमिनीवर हक्क सांगणे व शेत जमिनीचा मोबदला मांगने असे बरेच प्रकार उघडकीस येतात त्यामुळे खरेदी विक्री दरम्यान वाद निर्माण होतात. असे होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी. खालील १० सूत्रे पाहून जमीन खरेदी करणे.
१) शेत जमिनीचा ७/१२ सातबारा कोणाच्या नावावर आहे. व प्रत्यक्ष मालक कोण आहे हे बघणे
२) शेतीच्या ७/१२ सातबार्यावर इतर कोणाचा हक्क आहे का ते देखील पाहणे.
३) ही शेत जमीन जमीन मालकाच्या नावावर कशा पद्धतीने आलेली आहे ते देखील पहा.
४) शेत जमिनीवर कोणाचे कर्ज आहे का ते बघणे जसे कि बँक वित्तीय संस्था यांचाकडे ताबेगहाण तर आहे नाही हे पण पाहणे.
५) आपल्याला शेतामधी वापर करण्यासाठी जमिनी साठी रस्ता आहे का हे देखील पहा.
६) शेत जमिनीवर असलेली विहीर वर हक्क देखील पहा.
७) शेत जमिनीच्या हक्कांमध्ये कूळ कायदा व इतर व्यक्तींचे हक्क आहे का ते पाहने.
७) ७/१२ सातबार्यावर असलेली जमीन व प्रत्यक्ष पाहिलेली शेत जमीन यामध्ये काही फरक आहे का हे देखील पहा.
८) भूमी अभिलेख कार्यालयात किंवा मुद्रांक नोंदणी कार्यालयात जमिनीचे चालूचे भाव काढा. किंवा गावामध्ये चालू असलेल्या शेत जमिनीचे भाव पहा.
९) शेत जमीन खरेदी करताना कुठल्याही कायद्याचा व सु व्यवस्थेचा भंग होणार नाही याची दखल घ्यावी.
१०) शेत जमिनीचा व्यवहार करताना फक्त आणि फक्त जमीन मालकाशी व्यवहार करावा. एखाद्या एजंट ला मध्यस्थी करू नये.
कृपया वरील माहिती आवडली असल्यास हि माहिती इतरांना पण माहिती शेअर करा. जेणेकरून आपल्याला व आपल्या मित्रांना नवनवीन योजनांची माहिती मिळेल.
Social Plugin