Type Here to Get Search Results !

ads

तुमच्या संकल्पनेतील असलेले महा बजेट २०२३

तुमच्या संकल्पनेतील असलेले महा बजेट २०२३



   नमस्कार मित्रांनो आज आपण आज झालेल्या अर्थ बजेट मध्ये काय काय शिक्षण सेवक, योजना, विध्यार्थी, धार्मिक, शेतकरी, आदिवासी मागासवर्ग, पेंशनधारक, महिला, मुली, सामान्य माणसासाठी काय काय तरतुदी केल्या ते पाहणार आहोत.

१) प्रधानमंत्री आवास योजनेत ग्रामीण भागासाठी नविन १० लाख घरकुलाचे उद्धिष्ट ठेवण्यात आला आहे.

२) महाराष्ट्र परिवहन महामंडळाचा १०० नविन बस स्थानकासाठी व आधुनुकीकरण  दर्जा वाढ व पुनार्भाधानिकारिता सुमारे ४०० कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

३) शिर्डी विमानतळ येथे सुमारे ५२७ कोटी रुपये खर्चून नविन प्रवाशी टर्मिनल उभारण्यात येईल.


Whatsapp Group ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा


४) भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील स्मारकचे काम एप्रिल २०२५ प्रर्यात पूर्ण करण्यात येईल या कामासाठी ३४९ कोटी निधी शासनाने उपलब्ध करून दिला असून उर्वरित ७४१ कोटी निधी उपलब्ध करून देण्यात येईल याची तरतूद ठेवण्यात आली आहे.

५) बाळासाहेब ठाकरे यांचे दादर येथील शिवाजी पार्क येथे उभारण्यात आलेले स्मारकाचा पहिल्या टप्प्याचे काम मे २०२३ अखेर पूर्ण करण्याचे बजेट देखीन मांडण्यात आले आहे. या साठी राज्यशासनाकडून ३५१ कोटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

६) संजय निराधार योजना, श्रावण बाळ योजना प्रत्येकी लाभार्थी १५०० रु मासिक पेन्शन देण्यात येणार आहे.

७) नाट्यगृहाचा विकासकामासाठी सुमारे ५० कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

८) विविध मेट्रो प्रलापासाठी सुमारे ३९ हजार कोटी रुपये एवढी तरतूद करण्यात आली आहे. MMR क्षेत्रात मेट्रोच जाळ वाढवण्यावर भर देण्यात आले आहे.

९) अनुसूचित जातीचा उपयोजनेत १३८२० कोटी रुपये एवढा समावेश करण्यात आला आहे.

१०) आदिवासी उपाययोजनेत अनुसूचित जमाती साठी  १२६५५, कोटी रुपये समावेश करण्यात आला आहे.

११) महिला आणि बालकल्याण विकास विभागासाठी ४३ हजार रुपये कोटीचा निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे.

१२) राज्यातील शेतीसाठी २९ हजार १६३ कोटी रुपयाचा निधीचा देखील समावेश करण्यात आला आहे.

१३) पुण्यातील भिडे वाद्यासाठी ५० कोटीची तरतूद केली आहे.

१४)  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणाची तरतूद करण्यात आली आहे.

१५) सर्व महिलांना ५०% बस सेवा मध्ये सवलत देण्यात येणार आहे.

१६) केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या पंतप्रधान सन्मान निधी योजनेसारखी महाराष्ट्र शासन मनो शेतकरी महा सन्मान योजनेची घोषणा करण्यात आली या मध्ये शेतकर्यांना ६००० हजार रुपये प्रती वर्ष निधी  शेतकऱ्यांसाठी राज्याकडून देखील मिळणार. आता वर्षाचे केंद्र व राज्य मिळून १२००० हजार रुपये प्रती वर्षी मिळणार आहे.

१७) मागेल त्याला शेत तले सारखी आता मागेल त्याला ठिबक सिंचन योजनेची घोषणा करण्यात आली आहे.

१८) महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी केवळ १ रुपयात पिक विमा शेतकर्यांना केवळ १ रुपयात काढण्याची तरतूद असणार आहे. या साठी ३३१२ कोटी रुपये एवढी तरतूद असणार आहे.

१९) राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाकृषीविकास अभियान राबविणार यात शेतकर्यांना पिक, फळपिक, घटकांवर आधारित मुल्यावर्धानावर आधारित तालुका, जिल्हा, शेतकरी गट समूहासाठी योजना राबविणार यासाठी ५ वर्षात ३००० हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे.

२०) गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत आता शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान देखील मंजूर करण्यात येणार. अपघातग्रस्त शेतकर्यांना १ लाखाहून २ लाखांपर्यंत अनुदान देण्यात येणार.

२१) धनगर समाजासाठी २२ योजनाचे एकत्रीकरण करून शेळी मेंढी सहकार विकास महामंलाची स्थापना केली जाणार १० हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहोत धनगर समाजासाठी १००० हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

२२) काजू बोंडूवर प्रक्रिया वर भर व काजू उत्पादनात भर टाकणे काजू फळ पिक योजना राज्यात राबवणे व काजू पिकाला ७ पतीने भाव देणे या साठी ५ वर्षाकरिता १३२५ कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली.

२३) नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत १००० हजार जैविक प्रकल्प स्थापन करणार त्यासाठी ३ वर्षात १००० हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

२४) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी बांधवाना मुक्कामासाठी संत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारणार याची घोषणा करण्यात आली.

२५) धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रती हेक्टरी १५ हजार रुपये अनुदान देण्यात येणार.

अजून झालेले बजेट मध्ये पाहण्यसाठी इथे क्लिक करा

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ तरतूद खालीलप्रमाणे :-

 १) आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये

२) गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये

३) अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये

४) मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये वाढवण्याची तरतूद केली आहे.

५) अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये 

अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार अशी तरतूद करण्यात आली आहे. अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली स्थापन करणार

लेक लाडकी’ योजना हि नव्या स्वरूपात आणणार आहोत:-

 पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ लाभ खालील प्रमाणे

१) जन्मानंतर मुलीला 5000 रुपये तरतूद केली आहे.

२) पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये व अकरावीत 8000 रु तरतूद केली आहे.

३) मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रू मिळतील

Whatsapp Group ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा

वरील माहिती आवडली असल्यास शेयर करा व आमचा Whatsapp Group ला जॉईन होऊन नवनवीन योजनाची माहिती पहा आपल्या मोबाईलवर

Top Post Ad

Below Post Ad

Ads