अवकाळी पावसामुळे एन तोंडाशी आलेला घास जाण्याची शक्यता
नंदुरबार :- जिल्ह्यात गारपीट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तोंडाशी आलेला घास जाण्याची शक्यता आहे. हरभरा, गहू, ज्वारी, बाजरी हे पिके काढणीवर आलेल्या पिकांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सध्या शेतकऱ्यांना रडण्याची वेळ आली आहे.
नंदुरबार व धुळे जिल्ह्यात झालेल्या गारपीट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर धुळे, साक्री, निजामपूर, नंदुरबार, नवापूर, शहादा, या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्याकडून लाल मिरची घेऊन व्यापारी पाथार्यावर वाद्वाण्याशाठी टाकत असतात. पण अचानक आलेल्या पावसाने मिरचीचे पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आमच्या Whatsapp Group ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा
अश्या वेळीस शेतकरी हा मोठ्या आर्थिक परिस्थितीत अडकलेला असून आता शेतकऱ्यावर रडण्याची वेळ आली आहे. अशावेळी शासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी एवढीच अपेक्षा शेतकरी वर्ग करत आहे.
Social Plugin