Type Here to Get Search Results !

ads

शेळी गट योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

 शेळी गट योजनेसाठी अर्ज सादर करा नंदुरबार जिल्हा..!


   एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाअंतर्गत सन 2014-2015 या वर्षांतील विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत नोंदणीकृत आदिवासी महिला बचत गटांना शेळी गट योजनेचा लाभ देण्यासाठी नंदुरबार, नवापूर व शहादा तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या महिला बचत गटाकडून 14 मार्च, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मिनल करनवाल यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये सांगीतले आहे 


अर्ज डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा


Whatsapp Group ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा


शेळी गट योजनेसाठी अटी व शर्थी आवश्यक कागदपत्रे:

१) शेळी गट प्रकरणासाठी लाभार्थी महिला हि  बचत गट अनुसूचित जमातीचा असावा. 


२) बचत गट शासनाचा नोंदणीकृत असावा, 


३) नोंदणीकृत गटातील एका महिला सदस्याच्या नावे सातबारा उतारा असणे बंधनकारक राहील. 


४) पिण्याचे पाणी उपलब्ध असल्याचे ग्रामसेवकाचा दाखला, 


अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा


५) यापुर्वी इतर कोणत्याही शासकीय योजनामधुन लाभ न घेतल्याचे ग्रामपंचायतीचा ना-हरकत दाखला देणे बंधनकारक राहील, 


६) ग्रामसभेचा ठराव आवश्यक राहील, 


७) बचत गटाचे सदस्य यादीतील छायांकित प्रत, 


८) बचत गटाचे खाते असलेल्या बॅक पासबुकाची छायांकित प्रत, 


९) बचत गट सदस्य यादी प्रमाणे प्रत्येक सदस्याचे दोन पासपोर्ट फोटो, 


१०) आधार कार्ड, 


अर्ज डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा


११) दारिद्र्य रेषेखालील किंवा उत्पन्नाचा दाखला, 


१२) अनुसूचित जमातीचा जातीचा दाखला, 


१३) रेशनकार्ड छायांकित प्रत, 


१४) रहिवाशीबाबत स्वघोषणापत्र, 


१५) शेळी गटाची तीन वर्षांपर्यंत विक्री करणार नसल्याबद्दल दाखला. 


१६) योजनेच्या ठिकाणी नामफलक लावणार असल्याबाबतचा दाखला, 


अर्ज इथे पहा


१७) योजनेच्या अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा करारनामा १०० रूपयांचा स्टॅम्प वर अर्जा सोबत जोडणे आवश्यक राहील. 


योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमून्यातील अर्जाचे वाटप हे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचे कार्यालय, नवापूर रोड, नंदुरबार ४२५४१२ येथे २८ फेब्रुवारी २०२३ ते १४ मार्च २०२३ या कालावधीत कार्यालयीन वेळेत वाटप केले व स्विकारले जातील, असे सहाय्यक जिल्हाधिकारी मिनल करनवाल यांनी सांगितले आहे.


आमचा Whatsapp Group ला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा


Telegram Group ला जॉईन होण्यासाठी इथे क्लीक करा 

वरील लेख आवडल्यास इतरांना पण शेअर करा व Khansesh Corner चा Whatsapp Group ला जॉईन होऊन नवनविन माहिती आपल्या मोबाईलवर मिळवा

Top Post Ad

Below Post Ad

Ads