Type Here to Get Search Results !

ads

या किल्यावर साजरी होणार शिवजयंती

 जिथे औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज यांना कैद केले होते त्याच आग्रा येथील किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणार



महाराष्ट्र:- आग्रा किल्ल्यावर प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे. इथे औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे पुत्र संभाजीं महाराजांना कैद केले होते पण छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज या किल्ल्यावरून सुखरूप निसटले.



     साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना मुघल सम्राट औरंगजेबाने आग्रा किल्ल्यात कैद केले होते. औरंगजेबाने त्यांना मारण्याचा कट रचला होता. मात्र शिवाजी महाराज येथून सुखरूप निसटले होते. भारताच्या इतिहासात या घटनेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे या किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्याची मागणी होत होती. अखेर भारतीय पुरातत्व विभागाने (Archaeological Survey of India) परवानगी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन व अजिंक्य देवगिरी फाऊंडेशन यांच्या वतीने प्रथमच आग्रा किल्ल्यावर शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येणार आहे.

 

शबरी आवास योजना साठी इथे click करा .


     भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (Archaeological Survey of India) आग्रा किल्ल्यातील दिवाण-ए-आममध्ये शिवाजी जयंती साजरी करण्यास परवानगी दिली आहे. दिवाण-ए-आम जिथे प्रतिष्ठित लोकांसाठी वापरले जात असे. दिवाण-ए-आम हे परदेशी मान्यवर, राजदूत आणि राजे यांच्या मनोरंजनासाठी बांधले गेले. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अजिंक्य देवगिरी फाउंडेशनकडून विनोद आर पाटील यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली असता तिथे त्यांनी दाद मागितली होती. जिथे इतर सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली होती तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यास परवानगी का नाकारली जात आहे, असा युक्तिवाद करण्यात आला. अखेर उच्च न्यालायाच्या आदेशाने पुरातत्व विभागाने परवानगी दिली.


   मिनी ट्रक्टर साठी इथे CLICK करा.


    या आग्रा किल्ल्यावर साजऱ्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. १०  नोव्हेंबर २०२२ पासून अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. परंतु या किल्ल्याशी ऐतिहासिक संबंध असलेल्या महापुरुषाची जयंती साजरी करण्यास भारतीय पुरातत्व विभाग परवानगी देत ​​नव्हते. मात्र आता त्याला परवानगी मिळाल्याने फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात छत्रपती शिवाजी महाराजांवर श्रद्धा असलेल्यांना आनंद झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सांस्कृतिक मंत्री यांचे आभार मानले आहे.


Top Post Ad

Below Post Ad

Ads